March 30, 2008

आज तुझ्याशिवाय...
आज तुझ्यासाठी काही लिहायचे ठरवले होते..
पाहता पाहता तुझ्या प्रत्येक क्षणांनी मला हरवले होते..


आज या क्षणाला..तुझे प्रत्येक क्षण मला डिवचत होते..
प्रेम करायचे नव्हते तर.. इतके क्षण दिले का होते...?


असेच जर वागायचे होते तर.. माझे प्रत्येक क्षन तुला हवे का होते?
असेच जर वागायचे होते तर. प्रेमाचे क्षण दाखविले का होते..?


असेच जर तोडायचे होते तर.. क्षण जोडले का होते..?
मनात नसुन सुद्धा तुझ्या अस्तित्वाने मला हरविले होते..


आता कितीही रागवायचे म्हटले.. तरी तुझ्यावरच्या प्रेमाने गुंतविले होते..
यात तुझा दोष नाही !!.. कारण , तुझ्या अस्तित्वाचे सर्वच क्षण मला प्रिय होते.



March 14, 2008

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन..
...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून

दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून..
...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून

शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून..
...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?

नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून..
...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?

तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून..
...पहायचय रे मला एकदा प्रेम करून

March 06, 2008

स्वप्न


सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,


सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन


स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

March 05, 2008





नातं


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.


अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...


कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....


जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..


रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....


असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...


तरीही,


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

March 04, 2008

आयुष्य


कधी असेही जगून बघा.....
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

March 02, 2008





मराठी मुलगी


मराठी मुलगी
class मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.


class मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.


class मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.


class मध्ये अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते


class अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते


शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

post 2

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं ...